पुणे

‘नामा म्हणे आता लोपला दिनकर’

CD

आळंदी, ता. १७ : कार्तिक वद्य त्रयोदशी... वेळ दुपारी सव्वा बाराची... माउलींच्या समाधी समीप संत नामदेव महाराजांच्या पादुका... वीणामंडपात सुरू असलेले कीर्तन.... कीर्तनात मंत्रमुग्ध झालेले भाविक... अशा वातावरणात नामदास महाराजांनी ‘नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्‍वर समाधीस्थ’ असा अभंग म्हणताच भाविकांनी तुळशीची मंजिरी आणि पुष्पवृष्टी केली. यावेळी वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या... अशा वातावरणात माउलींचा ७२९ वा संजीवन समाधीदिन सोहळा आज आळंदी पार पडला.
सकाळपासूनच मंदिर परिसर लाखो वैष्णवांच्या गर्दीने गजबजून गेला होता. महाद्वारात गुरुवर्य हैबत बाबांच्या पायरीजवळ ऋषिकेश आरफळकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर हैबतबाबांच्या दिंडीने मंदिर प्रदक्षिणा केली. सकाळी सात वाजता विष्णू मंदिरातून नामदेव महाराजांच्या पादुका दिंडी मधून समाधी मंदिरात आणण्यात आल्या. त्यानंतर नामदास महाराजांनी माउलींच्या समाधीची आणि नामदेव महाराजांच्या समाधीची पूजा केली. दहा वाजण्याच्या सुमारास वीणा मंडपात नामदेव महाराजांचे सतरावे वंशज रामदास महाराजांच्या कीर्तनास प्रारंभ झाला. यावेळी वीणामंडपाचा सर्व मंदिर परिसर, नगर प्रदक्षिणामार्ग वैष्णवांच्या गर्दीने भरून गेला होता. प्रत्येक जण समाधी सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करीत होता.
दरम्यान अकरा वाजण्याच्या सुमारास भाविकांचे दर्शन बंद करण्यात आले. नंतर समाधी पुजारी राजाभाऊ चौधरी यांनी स्वच्छ केली. समाधीची सजावट करण्यात आली. तर माउली मंदिरातील वीणा मंडपात माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन सुरू होते. कीर्तनात नामदास महाराजांनी ‘बांधल्या तळ्याचे फुटलासे पाट, ओघ बारा वाट मुरडताती’ असे म्हणताच उपस्थितांचा बांध फुटला आणि अश्रू ओघळू लागले.
सकाळी पावणे बाराच्या सुमारास नामदास यांनी नामदेव महाराजांच्या पादुका माउलींच्या समाधीपाशी आणून ठेवल्या. उपस्थितांना फुले वाटण्यात आली. रामदास महाराजांनी माउली समाधीला गेल्याचा उल्लेख केला. ‘घेतीयेले तीर्थ तवा सकळ झाकियेले डोळे ब्रह्मा बोधे’ हा अभंग म्हणताच तुळशीच्या मंजिरी आणि पुष्पवृष्टी माउलींच्या समाधीवर अर्पण केली. दाटून आलेल्या कंठाने संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आरत्या म्हणण्यात आल्या. समाधी सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता झाली.
यावेळी नामदेव महाराजांचे वंशज नामदास कुटुंबीयांचा नारळ प्रसाद देऊन आळंदी देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी माधव महाराज रामदास, केशव महाराज नामदास, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त योगी निरंजन नाथ, ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. माधवी निगडे, ॲड. विकास ढगे, डी. डी. भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT