पुणे

आळंदीत आळेफाट्यातील वारकरी बेपत्ता

CD

आळंदी, ता. २३ : जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज रेडा समाधी मंदिर दिंडी सोबत आलेले रमेश पांडुरंग हांडे (वय ५३, रा. आळे कोळवाडी ता. जुन्नर) आळंदी येथून बेपत्ता झाले आहेत. तर दुसऱ्या घटनेमध्ये १७ वर्षीय युवतीही चऱ्होली (ता. खेड) येथून बेपत्ता झाली आहे.
हांडे हे कार्तिक यात्रेसाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज रेडा समाधी येथून दिंडी सोबत आले होते. आळंदीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये दिंडीचा मुक्काम होता. मंगळवारी (ता. १८) दुपारी दोनच्या दरम्यान दिंडी मधील एकाचा हांडे यांच्या मुलाला फोन आला की तुझे वडील दिंडीमध्ये दिसून येत नाहीत, घरी आले तर आम्हाला कळव. यावर हांडे यांच्या मुलाने शोध घेतला असता ते सापडले नाहीत. वडील बेपत्ता झाल्याच्या फिर्याद मुलगा मयूर हांडे यांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये दिली.
तर अन्य दुसऱ्या घटनेमध्ये १७ वर्षीय तरुणीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. चऱ्होली खुर्द येथील स्वामी समर्थ नगरमध्ये घरासमोर अंगणामधून युवती बेपत्ता झाली. ही घटना शुक्रवारी (ता. २१) घडली. याबाबत फिर्याद तरुणीच्या आईने आळंदी पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे. तरुणीने गुलाबी रंगाचा ड्रेस आणि काळे जॅकेट परिधान केले असून पायात बूट आहेत. दोन्ही बेपत्ता इसमांचा तपास आळंदी पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Rashid Khan: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर रशीद खानचा तीव्र संताप; म्हणाला, 'रमजानच्या पवित्र महिन्यात ही क्रूरता...'

IPL Kisse: वानखेडेवर शाहरुखचा संताप! विलासराव देशमुखांचा एक निर्णय अन् 5 वर्षांची बंदी, 2012 मधील IPL सामन्यात काय घडलं होतं?

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT