पुणे

आळंदीत पदयात्रांनी वातावरण निवडणूकमय

CD

आळंदी, ता. २४ : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे नारळ फुटले. भाजपच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे घरोघरी जाऊन मतदारांच्या दारात संपर्क साधण्यास सुरुवात केली. तर, शहरामध्ये विविध प्रभागात उभे असलेल्या उमेदवारांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून पदयात्रा, रिक्षा लावून स्पीकरद्वारे प्रचार सुरू झाला आहे. रिल आणि व्हाट्सॲपवर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाद्वारे प्रचारावर भर दिल्याने आळंदीतील वातावरण नगरपरिषद निवडणूकमय झाले आहे.
आळंदी नगरपरिषदेमध्ये सध्या दहा प्रभाग असून, २१ नगरसेवक निवडून जाणार आहेत. नगराध्यक्ष खुल्या प्रवर्गासाठी असल्याने विशेष महत्त्व आहे. सध्या भाजपच्या सुजाता तापकीर या नगरसेवक बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह नातेवाईकही प्रचाराच्या कामाला लावलेले दिसत आहेत. मतदार यादी घेऊन घरोघरी जाऊन पत्रके वाटप करून मतदारांना आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. उमेदवार पक्षाकडून उभे राहिले तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उमेदवारासाठी झटत आहे. सोशल मीडिया आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रचाराला जोर आला आहे. वचननामा, प्रसिद्धी पत्रके यावर सध्या जोर आहे. पदयात्रा, प्रत्यक्ष गाठीभेटी, कोपरा सभा, फोनद्वारे संपर्क अशा विविध माध्यमातून प्रचार सुरू आहे.
आळंदी नगरपरिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यात लढली जात आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार दिलीप मोहिते यांनी, तर शिवसेनेचा वतीने खासदार श्रीरंग बारणे यांनी आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरापुढील महाद्वारात नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली. भाजपच्या वतीने आमदार महेश लांडगे यांनी उमेदवारांसाठी आढावा घेऊन मार्गदर्शन करत आहेत.

नेत्यांच्या सभांचेही नियोजन
आळंदीतील समस्या पाहता अद्याप निवडणुकीचा जाहीरनामा कोणत्याच पक्षाकडून जाहीर झालेला नाही. उमेदवार स्वतःचे परिचय पत्रक सध्या घरोघरी वाटताना दिसत आहेत. यंदाच्या निवडणुकीत दिवसाही मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी पैसे वाटप होत असल्याचे चित्र आहे. साधारण एका मतासाठी १० ते १५ हजाराचा खर्च होत असल्याची चर्चा आहे. निवडणुकीसाठी एक आठवडा राहिला असताना अद्याप प्रचारासाठी मोठ्या नेत्यांच्या सभांबाबत नियोजन तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT