पुणे

पीएमपीचे स्थानक असून अडचण नसून खोळंबा

CD

आळंदी, ता. ५ : एस टी महामंडळाच्या आळंदीतील देहू फाटा चौकातील चार एकर जागेत पीएमपीएमएल बसेस उभ्या करण्यास शुक्रवारी (ता. २८) पासून सुरुवात झाली. यामुळे आळंदीकरांना आता दीड किलोमीटरची पायपीट बससाठी करावी लागत आहेच. पान नव्या जागेतही प्रवाशांना उभे राहायला चांगली जागा नाही. प्रवेशद्वारातच सांडपाणी डावलून जावे लागत आहे.
पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या वाढल्यामुळे नगर परिषद चौकातील जागा अपुरी पडत होती. याशिवाय प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जागा योग्य नसल्याने प्रवाशांची ही गैरसोय होत होती. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या चार एकर जागेमध्ये बस थांबायची सोय नुकतीच करण्यात आलेली. जवळपास ८० बसेस येथे थांबत आहेत. एवढी पुरेशी जागा या एसटी महामंडळाच्या जागेत पीएमपीएमएलने घेतली आहे. आता आळंदी देहू फाटा येथील नवीन एसटी स्थानकातून बससेवा सुरू झाली. मात्र, प्रवाशांची गैरसोय कायम आहे. बस स्थानकात शिरण्यापूर्वीच सांडपाणी आणि चिखल तुडवावा लागत आहे. याचबरोबर प्रवाशांना बसायला जागा नाही. चांगले शेड नाही. कोणत्याही सुविधे विना घाई करत पीएमपीएमएलने बस थांबा हलविला. मात्र यामुळे प्रवाशांचे हाल कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

आगार की स्थानक?
आळंदी शहराच्या मध्यवर्ती भागात प्रशस्त जागा एस टी महामंडळाची आहे. मात्र पीएमपीएमएल आल्याने एसटी आणि पीएमपीएमएल दोन्ही बसेस एकच ठिकाणी उभ्या असल्याचे चित्र आहे. अद्याप एसटी महामंडळाकडून जागा मंजूर न झाल्याने आता या जागेत एसटीचे आगार उभे राहणार की पीएमपीएमएल स्थानक हे पुढील काळात चित्र स्पष्ट होईल.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Baramati: बारामतीमध्ये विदेशी दारुचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Sangli Healthcare Services : जिल्हा नियोजन निधीची मोठी मदत; सांगली-मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे ‘मॉडर्न रूप’ MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!

Marathi Breaking News LIVE: मालवणी पोलिसांकडून नायजेरियन नागरिकाला ७२ लाखांच्या कोकेनसह अटक

५८ व्या वर्षीही माधुरी दीक्षितची त्वचा इतकी नितळ कशी? मुळीच चुकवत नाही 'या' तीन गोष्टी; म्हणते- सुंदर दिसण्यासाठी...

SCROLL FOR NEXT