पुणे

आळंदीत चार कोटी ४० लाख रुपये करवसुली

CD

आळंदी, ता. ८ : अभय योजनेअंतर्गत आळंदी नगरपरिषद कर विभागाकडून ५३ मिळकतीबाबत व्याजाची रक्कम वगळता कर वसुली करण्यात आली. चालू वर्षात एकूण ४०.४१ टक्के म्हणजे चार कोटी ४० लाख रुपये मिळकत कर वसुली झाली आहे. उर्वरित ६० टक्के कर वसुलीसाठी अवघे तीन महिने बाकी आहेत.
आळंदी नगरपरिषदेचे चालू आर्थिक वर्षात ११ कोटींची मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये मागील थकबाकी पाच कोटी ३३ लाख, चालू मागणी रक्कम पाच कोटी ६८ लाख आहे. यामध्ये थकबाकीपैकी एक कोटी ९७ लाख रुपयांची वसुली झाली, तर चालू वर्षात दोन कोटी ४८ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
याबाबत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले, ‘‘नगरपरिषद करवसुलीसाठी आता मतमोजणी झाल्यानंतर तीव्र स्वरूपात पाठपुरावा केला जाईल. ज्या मिळकत धारकांनी कर थकीत ठेवला आणि शास्ती कर, तसेच व्याज माफीसाठी अर्ज केला त्यांना जिल्हाधिकारी स्तरावर प्रकरण पाठवून ५० टक्क्यांपर्यंत व्याज माफी केली जाईल. मात्र, मुळ कर भरावाच लागेल. तसेच, ज्या मिळकत धारकांनी १०० टक्के शास्ती कर माफीसाठी अर्ज केला त्यांचे अर्ज प्रकरण राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहेत.’’
कर विभाग प्रमुख सीमा चारभे म्हणाल्या, ‘‘अभय योजना साठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवले होते. मात्र, प्रतिसाद कमी मिळाला. यातील ५३ अर्ज मंजूर झाले. त्यांना करावरील व्याजमाफी करून मिळकत कर भरून घेतला.’’

दृष्टिक्षेपात करवसुली
एकूण मिळकती - ८८९३
एकूण अधिकृत नळ जोड - ३५००
सप्टेंबर महिन्यातील करवसुली - २२ टक्के.
१७ नोव्हेंबरपर्यंत कर वसुली- ४ कोटी ७ लाख रुपये.
करवसुलीची टक्केवारी - ४०.४१ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : चौकार गेला, हातातून बॅट सटकली अन् साई सुदर्शनचा 'गेम'झाला... IPL मधील सर्वात विचित्र विकेट Video

Gold Loan Fraud: बनावट सोन्याने १८ लाखांचा घोटाळा; एचडीएफसी बँकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांवर गुन्हा

Sakal Vidya Education Expo : करिअरच्या वाटा; ३०, ३१ मे रोजी भेटा; काळेवाडीत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

SCROLL FOR NEXT