आळंदी, ता. १२ : परवाना नसतानाही देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल केले. प्रथमेश नितीन निरस (वय १९, रा. देहू फाटा, इंद्रायणी नगर, आळंदी, मूळ रा. गंगाखेड, जि. परभणी), असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी (ता. ११) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास चऱ्होली खुर्द येथील विश्रांती वड येथे त्याच्यावर कारवाई केली. याबाबतची फिर्याद बाळासाहेब खेडेकर या पोलिस कर्मचाऱ्याने दिली. ४५ हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपयांचे जिवंत काडतूस, असा ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना त्याच्याकडे आढळला.