पुणे

आळंदीत जादूटोणाप्रकरणी चौघांवर गुन्हा

CD

आळंदी, ता. २९ : अलौकिक शक्तिद्वारे पैशांचा पाऊस पाडून दाखवतो असे सांगून जादूटोणा केल्याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात चौघांवर रविवारी (ता. २८) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राजेंद्र वाकोडे, दगडू शिवराम गायकवाड, मीना कांबळे, सचिन मोरे अशा चौघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.
चऱ्होली खुर्दमधील संत भगवानबाबा नगरमध्ये ही घटना ९ डिसेंबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. याबाबत आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी फिर्याद दिली.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र वाकोडे आणि दगडू गायकवाड यांनी स्वतःकडे अलौकिक शक्ती असून तंत्र विद्येद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून कांबळे आणि मोरे यांनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घर उपलब्ध केले. पोलिस घटनास्थळी गेले असता एक पत्र्याचा डबा, लहान मुलांच्या खेळण्यातील नकली नोटांचे पाचशे रुपयांचे प्रत्येकी शंभरप्रमाणे सोळा बंडल मिळाले. दरम्यान महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध करणे आणि समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कलम ३ आणि ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणेकरांना आनंदाची बातमी! नवे ५०० खाटांचे रुग्णालय सुरू होणार, कुठे अन् सुविधा काय? जाणून घ्या

अक्षयासोबत लग्न झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? हार्दिक जोशीने सांगितली सगळ्या नवऱ्यांची व्यथा

राष्ट्रपती भवनातील जेवणात गुजराती चवीचा मान... साध्या बटाट्यातून राजेशाही स्वाद बनलेलं 'बटाटा नू शाक' आहे तरी काय?

Latest Marathi News Live Update : बारामती विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच समोर येणार

Coal Scam : कोळसा घोटाळा प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!, तब्बल 100 कोटींपेक्षाही अधिकची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT