पुणे

इंद्रायणीत आढळले मृत मासे

CD

आळंदी, ता. १७ : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी हद्दीतून आलेले मैलायुक्त सांडपाण्यामुळे आळंदीतील (ता. खेड) इंद्रायणी नदी काळवंडली आहे. पाण्यास पांढऱ्या रंगाचा फेस आला आहे. या प्रदूषित सांडपाण्यात मोठ्या मृत माशांचा खच पडल्याचे आढळून आले आहेत.

मागील महिन्याभरापासून प्रदूषणाची पातळी वाढली आणि नदी पात्रातील पाणीही कमी झाले. सांडपाणी आणि मैला मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळल्याने पाण्यातील जलजीवांना ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी मासे मोठ्या प्रमाणात मृत पावत आहेत. इंद्रायणीच्या पाण्यावर मेलेले मासे, प्लॅस्टिक, कुजके कपडे तरंगताना दिसत आहे. मेलेल्या माशांचा खच पाण्यावर आहे. यामुळे नदी परिसरात उग्र दर्प येत आहे.
उद्योनगरीतील प्रदूषणाचे उद्योग काही थांबेनात. नुकतेच इंद्रायणी प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी आळंदी देवस्थानकडून महाआरती करून जागर केला जात आहे तर आळंदी नगरपरिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत इंद्रायणी संवर्धनाचे आश्वासने दिली. मात्र, नदी पात्रात सांडपाणी सोडण्याचे पाप महापालिकेकडून कायम सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पालिकेकडून नदी पात्राची स्वच्छता होणे आवश्यक आहे. प्रदूषित पाण्यातच भाविक स्नान करत आहेत. याचबरोबर मच्छर वाढले आहेत. इंद्रायणी नदीवरील सिद्दबेट ते पुंडलिक परिसरात पाण्यावर फेस तर सांडपाणीच वाहत असल्याचे चित्र आहे. पुंडलिक परिसरात प्रदूषणामुळे नदी पात्र गटाराप्रमाणे स्वरूप आले आहे.
यामुळे इंद्रायणी विकास आराखडा आणि विकास याबाबतचे राज्यकर्त्याकडून केले जाणारे कोटीचे आकडेवारी फक्त आतापर्यंत कागदावरच असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर सुजाण आणि कणखर नेतृत्व आळंदीला मागील काही वर्षात न लाभल्याने इंद्रायणीची दुरवस्था आळंदीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला उघड्या डोळ्यांनी पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.


07016

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT