पुणे

आळंदीत कीर्तन महोत्सव

CD

आळंदी, ता. १८ : अमृतनाथ स्वामी महाराज ५८व्या पुण्यतिथीनिमित्त आळंदीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्ताने आळंदीकर आणि भाविकांना कीर्तन श्रवणाचा लाभ मिळणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी दिली.
कीर्तन महोत्सव सोमवार (ता. १९) ते सोमवार (ता. २६)पर्यंत आळंदीतील सद्‍गुरू अमृतनाथ स्वामी महाराज संस्थेमध्ये दररोज संध्याकाळी सात ते नऊ या काळामध्ये तर काल्याचे कीर्तन सोमवारी (ता. २६) सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार आहे. दरम्यान या कीर्तन महोत्सवामध्ये उद्या सोमवारी (ता. १९) उल्हास महाराज सूर्यवंशी, मंगळवारी (ता. २०) समाधान महाराज शर्मा, बुधवारी (ता. २१) ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गुरुवारी (ता. २२) डॉ. भावार्थ देखणे, शुक्रवारी (ता. २३) प्रमोद महाराज जगताप, शनिवारी (ता. २४) पुरुषोत्तम महाराज पाटील, रविवारी (ता. २५) चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन तर सोमवारी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये काल्याचे कीर्तन प्रभुराज महाराज पाटील यांचे सोमवारी (ता. २६) होईल. काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

SCROLL FOR NEXT