पुणे

इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी सरसावले नगरसेवक

CD

आळंदी, ता. ३१ : इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण पाहता राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना तीर्थ स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आळंदी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक हे आग्रही असून नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे तथा पीठासीन अधिकारी यांनी मंगळवारी (ता. 3) विशेष सभा बोलावली आहे. या विशेष सभेमध्ये इंद्रायणी नदी प्रदूषण आणि नदी स्वच्छतेबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, ‘‘मागील पंधरा वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत भागातून रसायनयुक्त सांडपाणी तसेच घरगुती वापराचे सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात कोणत्याही प्रक्रिये विना सोडले जात आहे. विविध भागातील नागरिकरण वाढले परिणामी घरांची संख्या वाढली पाण्याचा वापर वाढला यामुळे सांडपाणी आणि मैला पाणीही वाढले. मात्र हे होत असताना सांडपाणी मैला पाणी याचा निचरा करण्याबाबत व्यवस्थापन झाले नाही. तसेच सांडपाणी पुनर्वापर योजना पूर्ण क्षमतेने सुनियोजित चालवली जात नाही असे दिसून येत आहे. सरकार तसेच प्रशासनातील सेवक नदी प्रदूषणाकडे मागील काही वर्षात गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणत्याही प्रकारचे काम इंद्रायणी नदीबाबत ठोसपणे करत नाहीत. परिणामी देहू, आळंदी, तुळापूर सारख्या तीर्थक्षेत्रांच्या गावांना इंद्रायणी नदीपात्रात सांडपाणी मैलायुक्त पाणी पाहायला मिळत आहे.
राज्यभरातून आलेल्या भाविक वारकऱ्यांना इंद्रायणी नदीपात्रात तीर्थस्थान करण्यासाठी स्वच्छ पाणी संपूर्ण नदीपात्रात कुठेच नसल्याचे चित्र आहे. यामुळे कार्तिकी आणि आषाढी वारीमध्ये वडिवळे तसेच जाधववाडी सारख्या धरणातील पाण्याचा आसरा घ्यावा लागतो. मात्र अन्य महिन्याच्या एकादशीला तसेच अन्य दिवशी येणाऱ्या भाविकांची मात्र तीर्थ स्नानाच्या पाण्याची गैरसोयच होत असते. हे टाळण्यासाठी आळंदी नगर परिषदेच्या वतीने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपयोजना काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी नगरसेवकांची विशेष सभा बोलवण्यात आले आहे. यामध्ये इंद्रायणी सिद्धबेट परिसर ते गरुड स्तंभ आणि गरुड स्तंभ ते स्मशानभूमीपर्यंतच्या इंद्रायणी नदी पात्रात असलेला विविध प्रकारचा राडारोडा सांडपाण्याचे प्रदूषण निर्माल्य टाकणाऱ्यांवर करण्यात येणारे कारवाईबाबत विशेष चर्चा केली जाणार आहे.

स्वच्छता मोहीम राबविणार
गंगा नदीप्रमाणे आळंदीमध्ये इंद्रायणी आरती देवस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र आरती बरोबरच प्रत्यक्ष नदीपात्रात उतरून स्वच्छता करणे गरजेचे असल्याने आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सामूहिकरित्या पुढील आठवड्यामध्ये इंद्रायणी नदीच्या आरती सोहळ्यापूर्वी नदीपात्राची स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थ विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी तसेच नगरपरिषद आणि वारकरी संप्रदायातील विविध व्यक्तींना सहभागी करून घेतले जाणार आहे. याचबरोबर इंद्रायणी उगम स्थान ते संगमस्थानापर्यंत विविध गावांमध्ये अशा पद्धतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यासाठी जागृती करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष कुऱ्हाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

SCROLL FOR NEXT