burglary in bibvewadi pune

 

esakal

पुणे

Pune Crime: बिबवेवाडीतील सोसायटीत घरफोडीचा प्रयत्न; सीसीटीव्ही व सुरक्षा नसल्याने नागरिकांमध्ये भीती

Bibwewadi burglary: सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षकांचा अभाव; बिबवेवाडीतील सोसायटीत घरफोडीची घटना

CD

बिबवेवाडी येथील राजयोग सोसायटी रोडवर असलेल्या दिग्विजय अपार्टमेंट, गृहकल्पा को-ऑप. हौसिंग सोसायटी येथे एका फ्लॅटमध्ये कुलूप तोडून घरफोडीची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी पहाटे अंदाजे २ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेत जोरात दुचाकी जात असल्याचा आवाज ऐकू आला होता. त्यानंतर चोरट्यांनी संबंधित फ्लॅटमधील कपाट फोडले, मात्र त्यांना कोणतीही मौल्यवान वस्तू हाती लागली नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विशेष म्हणजे, या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सुरक्षा रक्षक उपलब्ध नाहीत, त्यामुळे चोरट्यांना घरफोडी करण्यास वाव मिळाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. सोसायटीत अनेक ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या घटनेची माहिती बिबवेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून नागरिकांनी अधिक सतर्क राहावे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा घटना दिसल्यास तात्काळ ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT