आळंदी, ता. १० ः चऱ्होली खुर्दमधील एका शेताच्या बांधावर अनोळखी पुरुषाने झाडाला लटकून नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघड झाली.
ही घटना चऱ्होली खुर्दमध्ये सोमवारी (ता. ९) सकाळी नऊच्या दरम्यान उघड झाली. याबाबत माहिती आळंदीतील पोलिस त्रिमूर्ती भोडवे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली खुर्दमधील एका शेतकऱ्याला गळफास घेऊन लटकलेली व्यक्त दिसली. याबाबत त्यांनी माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी साधारण तीस ते पस्तीस वर्षाचा अनोळखी पुरुष शेतातील झाडावर नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेला दिसला. पोलिसांनी बेशुद्ध व्यक्तीला झाडावरून खाली घेतले आणि उपचारासाठी आळंदी ग्रामिण रूग्णालयात नेले. यावेळी ग्रामिण रुग्णालयाकडून मृत घोषित करण्यात आले. अकस्मात मृत्यूची नोंद आळंदी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.