पुणे

महिलेचा खून करून आत्महत्येचा बनाव

CD

आळंदी, ता. २२ : बिगारी काम करणाऱ्या महिलेचा सोळू येथील जंगलामध्ये शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी चारच्या सुमारास अज्ञात कारणावरून गळा आवळून तरुणाने खून केला. तसेच, गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने व आत्महत्येचा बनाव निर्माण करण्यासाठी आरोपीने महिलेचा मृतदेह झाडाला स्कार्फच्या साहाय्याने बांधून ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला २४ तासांत अटक केली.
पार्वती दगडूजी दराडे (वय ३०, रा. माऊली पार्क, राजगुरुनगर बँकेच्या मागे, आळंदी), असे खून झालेल्या महिलेचे नाव नाव आहे. या प्रकरणी शनिवारी (ता. २१) मध्यरात्री दहा वाजून २१ मिनिटांनी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विष्णू महादेव पावडे (वय ३२, रा. धानोरे, ता. खेड, मूळगाव हादगाव, सेलू, जि. परभणी) याला आळंदी पोलिसांनी २४ तासांत अटक केले.
याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी माहिती दिली की, या घटनेबाबत खबर खून झालेल्या महिलेचा पती दगडूजी उत्तम दराडे यांनी दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्वती दराडे या धानोरे येथील विष्णू पावडे यांच्याकडे बिगारी काम करत होत्या. एकमेकांच्या ओळखीतून पार्वती दराडे आणि विष्णू पावडे कामानिमित्त एकत्र घराबाहेर पडले आणि मोटरसायकल वरून सोळू येथे गेले. तेथील डोंगरावर जाऊन दोघांमध्ये अज्ञात कारणावरून भांडण झाले. विष्णू याने पार्वती यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने व आत्महत्येचा बनाव निर्माण करण्यासाठी पार्वती हिचा मृतदेह तेथील झाडाला जमिनीपासून चार फूट उंचीवर स्कार्फच्या साह्याने बांधून बसलेल्या स्थितीत मृतदेहाच्या गळ्याला स्कार्फचे दुसरे टोक बांधले आणि घटनास्थळावरून पळाला. दरम्यान, आळंदी पोलिसांनी तपास तीव्र गतीने करून आरोपी पावडे या २४ तासांच्या आत अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT