आळंदी, ता. २५ : विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना कुमकुम तिलक करून फुले वाहून पालकांच्या गळ्यात हार घालून आई-वडिलांच्या पायावर डोके ठेवून वंदन करून भोवती सात प्रदक्षिणा घातल्या. तसेच आई-वडिलांची अखंड सेवा करण्याचा दृढ निश्चय केला. आई-वडिलांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून ‘त्रिलोचन बना व आयुष्यात यशस्वी व्हा’ असे आशीर्वाद देत आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साहात मातृ-पितृ पूजन सोहळा पार पडला.
माऊलींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेची सहल यावर्षी रायगड किल्ल्यावर गेली होती, सहलीवर आधारित परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील तीन क्रमांकाचे विद्यार्थी व एक उत्तेजनार्थ विद्यार्थ्यास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस, प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी आळंदीतील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, ज्ञानेश्वर विद्यालयाचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य किसन राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. आभार वैशाली शेळके यांनी मानले. सूत्रसंचालन राहुल चव्हाण, आरती गावडे यांनी केले.
दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांकरिता एक रोबोटिक मॉडेल व दहा हजार एकशे अकरा रुपये प्रशालेच्या भौतिक सुविधांसाठी देऊन शाळेप्रति ज्ञानेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीश साळुंखे कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.