पुणे

इंद्रायणी स्वच्छता मोहिमेऐवजी आता थेट कारवाई

CD

आळंदी, ता. २५ : इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ स्वच्छता मोहिमा न राबवता प्रदूषणाच्या मुळावर घाव घातला जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्या व गृहप्रकल्पांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महापौर रवी लांडगे यांनी दिले.
इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आळंदी नगरपरिषद यांची आढावा बैठक मंगळवारी (ता. २४) महापौर दालनात पार पडली. त्यावेळी महापौर लांडगे बोलत होते. याप्रसंगी आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नवनिर्वाचित नगरसेवक, महापालिकेतील पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी उपस्थित होते. महापौर लांडगे म्हणाले, "औद्योगिक रसायने किंवा सोसायट्यांचे सांडपाणी नदीत सोडणाऱ्यांवर महापालिकेमार्फत कठोर यंत्रणा उभी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही." यावेळी त्यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला नदीपात्रात सांडपाणी सोडणाऱ्या उद्योजकांचे व गृहप्रकल्पांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. आळंदी नगरपरिषदेनेही त्यांच्या स्तरावर सर्वेक्षण करून माहिती द्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT