पुणे

आळंदीतील स्वच्छतागृहांची दुरवस्था

CD

आळंदी, ता. ३ : राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत ३२ कोटी रुपये खर्चून आळंदीत बांधलेली १४ स्वच्छतागृहे नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहेत. देखभालीअभावी ही स्वच्छतागृहे कुलुप बंद असून वारकरी आणि महिला भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.
शहरातील भागीरथीनाला, घुंडरे गल्ली, मरकळ चौक यांसह विविध ठिकाणी १०-१२ वर्षांपूर्वी ही सुसज्ज शौचालये उभारण्यात आली होती. मात्र, सध्या येथे नळ, वीज आणि स्वच्छतेचा पूर्णतः अभाव आहे. अनेक ठिकाणी दरवाजे तुटलेले असून सांडपाण्याच्या टाक्यांची झाकणेही गायब आहेत. दरवर्षी वारीच्या काळात दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होऊनही परिस्थिती ''जैसे थे'' आहे. स्वच्छ भारत अभियानाचा दावा करणाऱ्या नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वास्तविक आरोग्य विभागाकडून दैनंदिन स्वच्छतेसाठी ठेका दिला जातो, मात्र या स्वच्छतागृहांची स्वच्छता नाही की नियमित पाणी नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही बहुतांश स्वच्छतागृहे कुलूपबंद आहेत. तरीही नळ चोरीला जाणे, दरवाजे तोडणे, विजेचे दिवे चोरीला जाणे, भांडे तोडणे असे प्रकार होऊ लागले. स्वच्छतागृहांच्या टाक्याही नियमितपणे स्वच्छ केल्या जात नाहीत. तर काही ठिकाणची झाकणे तुटलेली आहेत प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्य शासनाने बांधून दिलेले चांगले आणि मध्यवर्ती ठिकाणचे शौचालय सध्या दुरवस्थेत आहे.

पुढील तीन दिवसांमध्ये मरकळ चौकातील स्वच्छतागृहे पाडले जाईल. त्या ठिकाणी नवीन स्वच्छतागृह उभी केली जाणार आहे. त्याचबरोबर येथील पाण्याची टाकी ही पाडण्यात येणार आहे. तसेच भागीरथी नाल्यावरील एक स्वच्छतागृह पाडले जाणार आहे. याबाबतचा ठराव नुकतेच सर्वसाधारण सभेत केला आहे.
- प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष

स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेकडे वेळीच लक्ष देऊन अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न नगरपरिषद प्रशासन करेल.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

SCROLL FOR NEXT