पुणे

आळंदीत ठेका कर्मचाऱ्यांचा वेतनप्रश्न ऐरणीवर

CD

आळंदी, ता. ५ : आळंदी नगरपरिषद अंतर्गत ठेका पद्धतीने कार्यरत असलेल्या सुमारे ६५ कर्मचाऱ्यांना शासनाने अधिसूचित केलेले किमान वेतन तसेच इतर वैधानिक लाभ न दिल्याने याबाबत तत्काळ चौकशी करण्याची मागणी कामगारांकडून करण्यात आली आहे.
आळंदी नगरपरिषदेचे ठेक्यातील रोजंदारीवरील माजी कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी पुणे जिल्ह्याचे कामगार उप आयुक्त निखिल वाळके यांना निवेदन सादर केले आहे. सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १ एप्रिल २०२२ पासून आळंदी नगरपरिषदेत एका ठेकेदारामार्फत विविध विभागांमध्ये अंदाजे ६५ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन, घरभाडे भत्ता, बोनस, रजा वेतन तसेच इतर वैधानिक लाभ नियमितपणे व पूर्णपणे देण्यात आलेले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच उपलब्ध वेतन नोंदी, उपस्थिती पत्रके तसेच भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) व कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) संदर्भातील कागदपत्रांमध्ये विसंगती आढळून येत असल्याने किमान वेतन अधिनियम १९४८, करार कामगार (नियमन व समाप्ती) अधिनियम १९७० तसेच वेतन भुगतान अधिनियम १९३६ यांसारख्या कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणात तत्काळ प्रत्यक्ष स्थळ तपासणी करून आळंदी नगरपरिषद हा प्रमुख नियोक्ता व संबंधित ठेकेदार यांची संयुक्त कायदेशीर जबाबदारी निश्चित करावी. तसेच एप्रिल २०२२ पासून आजपर्यंतची किमान वेतन फरक रक्कम, घरभाडे भत्ता, बोनस, रजा वेतन व इतर सर्व वैधानिक देणी संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही करावी. याशिवाय जाणीवपूर्वक कायदेभंग किंवा आर्थिक अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Flood Latest News : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 2 तासांत 200 मिमी पाऊस, Qinzhou शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती

Jalgaon Temperature : तापमानाचा पारा ४४ पार; उष्माघाताचा धोका वाढला!

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT