पुणे

वारकरी विद्यार्थ्याची आळंदीत आत्महत्या

CD

आळंदी, ता. ११ : सिद्धबेट- आळंदी येथील आंब्याच्या झाडाला कापडी उपरण्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत १९ वर्षीय वारकरी विद्यार्थी आढळला. गणेश जयराम भोये (रा. पोवीळवंडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक), असे त्याचे नाव आहे.
याबाबत आळंदी पोलिसांनी माहिती दिली की, गणेश भोये हा आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. आळंदीतील सिद्धबेट येथील शिवाजी महाराज पोळ यांचे धर्मशाळा मध्ये राहात होता. सोबतच्या अन्य वारकरी विद्यार्थ्यांना गणेश यांनी मंगळवारी (ता. १०) रात्री उशिरा मंदिरात जातो सांगून तो धर्मशाळेबाहेर गेला. यानंतर पहाटेच्या वेळी अन्य विद्यार्थी नियमितपणे उठले, मात्र तो दिसून आला नाही. दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास सिद्धबेटजवळ लोकांची गर्दी दिसून आली. यावेळी तेथील एका आंब्याच्या झाडाला कापडी उपरण्याने गळफास घेतलेला अवस्थेत गणेश दिसून आला. त्यानंतर त्याला लटकलेल्या अवस्थेतून खाली घेऊन पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेले. याप्रकरणी खबर यश परमेश्वर गव्हाणे यांनी दिली. याबाबत आळंदी पोलिस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यू नोंद केली आहे.
गणेश भोये हा आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तृतीय वर्षामध्ये शिकत होता. परीक्षेमध्ये त्याचा दुसरा नंबर आला होता. आध्यात्मिक शिक्षणामध्ये तो हुशार म्हणून गणला जात होता. त्याच्या आकस्मित जाण्याने विद्यार्थी वर्गामध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT