पुणे

माउलींच्या मंदिरात प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव

CD

आळंदी, ता. २६ : फुलांनी सजविलेला आकर्षक मंडप... ब्रह्मावृंदांनी केलेले राम सूक्त आणि पुरुषोत्तम सूक्त मंत्रोच्चार... लहानशा पाळण्यात सजवलेले प्रभू रामाची मूर्ती... अशा आनंददायी वातावरणात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उपस्थित रामभक्तांनी ‘श्री रामचंद्र की जय’ आणि ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’चा गजर करत पुष्पांचा वर्षाव केला. अशा आनंददायी वातावरणात संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिर आणि प्रभू रामचंद्र मंदिरात राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
आळंदीत माउलींच्या मंदिरांतील वीणा मंडपामध्ये रामजन्मानिमित्त आज सकाळपासूनच फुलांची आरास कली होती. तर पाळण्यामध्ये प्रभू रामाची मूर्ती ठेवून राम जन्माची तयारी सुरू होती. वीणा मंडपामध्ये देवस्थानचे विश्‍वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी सकाळी दहा ते बारा राम जन्माचे कीर्तन केले. यावेळी विश्‍वस्त ॲड. राजेंद्र उमाप मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि मानकरी उपस्थित होते. दुपारी १२ नंतर राम जन्माच्या वेळी महिलांनी राम जन्माचा पाळणा म्हटला आणि प्रभू रामचंद्राचा गजर करत फुलांची वृष्टी करून रामजन्म साजरा केला. शहरातील श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांच्या आवेकर भावे श्री राम मंदिराचाही राम जन्माचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. राम जन्माच्या कार्यक्रमानंतर ठिकठिकाणी महिलांनी सुंठवडा वाटप केला. दरम्यान माउलींच्या संजीवन समाधी समोरील महाद्वारात राम भक्तांकडून प्रभू रामाची भव्य मूर्ती उभी करून पूजा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT