पुणे

अवैध दारूविक्री प्रकरणी आळंदीत एकावर गुन्हा

CD

आळंदी, ता. २७ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने चिंबळी येथील हॉटेलवर मारलेल्या छाप्यात १२ हजार ४२० रुपयांची अवैध देशी दारू आणि बियरच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच, हॉटेलमधील किरण कैलास पाटोळे (वय २६, रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) याच्यावर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई चिंबळी येथील बर्गे वस्तीवरील शिवस्वरांश हॉटेल या ठिकाणी गुरुवारी (ता. २६) दुपारी एकच्या दरम्यान झाली. याबाबत खंडणी विरोधी पथकातील पोलिस प्रदीप गोडांबे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत आळंदी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT