आळंदी, ता. २८ : आंघोळ करत असलेल्या १५ वर्षीय मुलीचे मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी विकास पाटोळे याच्यावर आळंदी पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २७) पहाटे साडेपाचच्या सुमारास आळंदी परिसरातील एका गावात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या चुलत्यांकडे राहते. शुक्रवारी पहाटे ती स्नानगृहात असताना आरोपी विकास पाटोळे याने बाहेरील लोखंडी जाळीतून मोबाईलद्वारे तिचे चित्रीकरण केले. याप्रकरणी पीडितेच्या चुलत्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.