आळंदी, ता. १ : आळंदी नगर परिषदेने २०२५ - २६ या आर्थिक वर्षात एकूण मिळकतकर वसुली ७६.१८ टक्के मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत केली. थकबाकीसह चालू मागणी मिळकत करापैकी ८ कोटी ३९ लाख रुपयांची वसुली आर्थिक वर्षात ३१ मार्च पर्यंत कर विभागाने केली.
आळंदी नगर परिषदेचे मागील काही वर्षे कर वसुली टक्केवारी कमी होती. दरम्यान, यंदाच्या आर्थिक वर्षात नगरपरिषद निवडणूक पार पडल्यानंतर कर विभागाने मिळकतकर वसुलीसाठी तगादा लावला. कर विभागाने प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची नेमणूक करून कर वसुली केली. कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या एकूण मिळकत करावर व्याज माफ करून अभय योजना नगर परिषदेने राबवली. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला; मात्र नगर परिषदेने यंदाच्या वर्षी ७६.१८ टक्के वसुली केली. एप्रिल महिन्यातही कराची वसुली सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कर निरीक्षक सीमा चारभाने म्हणाल्या की, "मिळकत कर वसुलीसाठी नगरपरिषदेतील विभाग प्रमुख आणि रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचे ग्रुप तयार करून प्रभागनिहाय पथक तयार केले. दोन वर्षांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्यांच्या दारात जाऊन मिळकत कर वसुली केली. कर्मचाऱ्यांनी प्रभावी काम केल्यामुळे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कर वसुली यंदाच्या वर्षी झाली. एप्रिल महिन्यातही अशाच पद्धतीने कर वसुली करून अधिकाधिक भरणा केला जाणार आहे. दरम्यान, ३१ मार्च या अखेरच्या दिवशी तब्बल ४० लाख २० हजार रुपयांची कर वसुली करण्यात आली.''''
२०२५-२६ वर्षातील आढावा रुपयांत
थकबाकी : ५ कोटी ३३ लाख ६८ हजार
चालू मिळकतकर मागणी : ५ कोटी ६८ लाख
एकूण उद्दिष्ट : ११ कोटी २ लाख
थकबाकी मिळकत करापैकी वसुली : ३ कोटी ६७ लाख
चालू मिळकत करापैकी वसुली : ४ कोटी ७२ लाख
एकूण वसुली : ८ कोटी ३९ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.