पुणे

आळंदीत इंद्रायणीचे पाणी फेसाळले

CD

आळंदी, ता. ४ : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी आज पहाटेपासून फेसाळली होती. प्रदूषण युक्त सांडपाण्याबरोबरच जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीपत्रात वाहून गेल्याचे चित्र आहे.
पंधरा वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिका तसेच अन्य काही ग्रामपंचायत नगरपरिषद हद्दीतून रासायनीच सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळले जात आहे. इंद्रायणी नदीपात्रामध्ये सांडपाणी मिसळल्याने नदीला अक्षरशः गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचा स्वतंत्र विभाग आहे. मात्र रासायनिक सांडपाणी सोडले जाण्याचे प्रमाण महापालिका हद्दीतून वाढले तरी हे प्रदूषण नियंत्रण महामंडळ काहीच उपाययोजना करत नसल्याचे चित्र आहे. चिखली, कुदळवाडी, तळवडे, मावळ भागातील ग्रामपंचायत, नगरपंचायत यासारख्या भागांमधील औद्योगिक विभागातून येणारे पाणी तसेच घरगुती सांडपाणी यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यानेच आळंदीमध्ये थेट इंद्रायणीला गटाराचे स्वरूप आले आहे.
मध्यंतरी आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे स्वतः महापौर रवी लांडगे यांना भेटून इंद्रायणी प्रदूषणाबाबत चर्चा केली. पालिका हद्दीतून होणारे सांडपाणी मिश्रणाबाबत मात्र आळंदीकरांना कोणतेही निराकरण महापौर तसेच महापालिका अधिकाऱ्यांकडून झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT