आळंदी, ता. १६ : येथे नागरिकांना पूर्वसूचना देण्यासाठीचा सायरन न वाजवताच टोईंग व्हॅनने थेट गाड्या उचलून कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांना मंगळवारी (ता. १४) आमदार बाबाजी काळे यांनी फैलावर घेतले. पोलिसांचा पाठलाग करत, ‘आधी पार्किंग दाखवा आणि मगच कारवाई करा,’ असा इशारा त्यांनी दिला.
आमदार काळे मंगळवारी आळंदीला खासगी भेटीगाठी आले होते. यावेळी सकाळी अकरा वाजता महाद्वार चौकात वाहतूक पोलिसांची मनमानी त्यांना पाहायला मिळाली. आळंदीत महाद्वार चौक ते चावडीदरम्यान वाहतूक पोलिस ‘नो पार्किंग’चे कारण सांगून गाड्या उचलत होते. यावेळी पोलिसांच्या मागोमाग आमदार काळे चालत होते आणि त्यांचा कारभार पाहत होते. सूचना देणारा सायरन पोलिसांकडून वाजवला जात नव्हता आणि थेट गाड्या उचलल्या जात होता. त्यामुळे चिडलेल्या आमदार काळे यांनी येथील वाहतूक पोलिसांना सुनावले.
‘आधी पार्किंगची सोय करा, पार्किंग कुठे आहे, हे सांगा आणि मगच गाड्यांवर कारवाई करा. आळंदीला गोरगरीब वारकरी दर्शनासाठी येतात आणि त्यांना तुम्ही गाड्या उचलून दंड आकारता, हे सर्व चुकीचे आहे. आळंदी देणाऱ्या भाविकांना कोणताही आर्थिक भुर्दंड झाला नाही पाहिजे, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. केवळ महाद्वारातील गाड्या उचलण्यासाठी पोलिसांना सांगितले होते. अन्य रस्त्यावरील गाड्या उचलू नये, हेही निक्षून सांगितले होते. यामुळे अजिबात कारवाई करायची नाही,’ अशी सूचना आमदार काळे यांनी दिल्या.
दरम्यान, आमदार काळे निघून गेल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी पुन्हा गाड्या उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आमदारांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली, अशीच चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.