पुणे

जर्मनीत संत मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

CD

आळंदी, ता. २१ : जर्मनीतील किर्चहेम येथील विठ्ठलधाम मंदिरात दरवर्षी हजारो परदेशी नागरिक भेटी देतात. आता ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांचेही दर्शन घेतील. वारकरी संप्रदाय अवघ्या जगाचे आकर्षण आहे. दोन्ही संतांच्या मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार अनेक देशांमध्ये आपोआप होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जर्मनीतील रेनबोल्डशॉसर स्ट्रासे किर्चहेम येथील विठ्ठलधाम मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची रविवारी प्रतिष्ठापना केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आळंदी आणि देहू देवस्थानच्या गौरव पर एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘‘अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दोन्ही संतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. जागतिक प्रचार प्रचारासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. यासाठी आळंदी आणि देहू देवस्थाने या मूर्ती भेट स्वरूपात दिल्या. महाराष्ट्रातील सरकारने वारकऱ्यांसाठी पालखी मार्गाची निर्मिती केली. हरितवारी निर्मलवारी अशा अनेक उपक्रम राबवते. आता जागतिक पातळी सुद्धा आमच्या वारकरी संतांचा गौरव होत आहे, हा निश्चितच अभिमानास्पद क्षण आहे. त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार मानतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vajreshwari Kund : वज्रेश्वरीतील गरम पाण्याचे झरे धोक्यात! शंकर मंदिरासमोरील पवित्र कुंड पूर्णपणे कोरडे; भाविकांमध्ये तीव्र नाराजी, गेल्या 3 वर्षांपासून नेमकं काय घडतंय?

Gangapur farmers: गंगापूर तालुक्यात मान्सून रखडल्याने शेतकरी चिंताग्रस्त; मृग नक्षत्रात पावसाची प्रतीक्षा, 15 जूननंतर पेरणीचा सल्ला

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत सात वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी चामोर्शी कडकडीत बंद

MPSC Success Story भावाने उचलली शिक्षणाची जबाबदारी; बहिणीची जिद्दीच्या जोरावर MPSC मध्ये भरारी, पूजा घोडके यांचा प्रेरणादायी प्रवास..

वर्ल्डकपआधीच फूटबॉलविश्व हादरलं! मुंबईत नामांकित प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ बनवून ३ वर्षे ब्लॅकमेल

SCROLL FOR NEXT