पुणे

आळंदी-मरकळ रस्त्यावर दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

CD

आळंदी, ता. २० : आळंदी-मरकळ रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. किसन चंद्रसिंह धामी (रा. वेदांत हॉटेल, चऱ्होली बुद्रुक) असे अपघातात मृत्यू झालेल्यास नाव असून, याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन धामी हे गुरुवारी (ता. १६) कामावरून दुचाकीने घरी परतत असताना त्यांची मोटारसायकल घसरली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. १७) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा मावस भाऊ राजू बाबूराव थापा (रा. चिखली) यांनी रविवारी (ता. १९) फिर्याद दिली. आळंदी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : जसप्रीतने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही? हार्दिकचे चकीत करणारे विधान; म्हणाला, ती माझी समस्या नाही

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

SCROLL FOR NEXT