आळंदी, ता. ६ : आळंदी-वडगाव घेनंद रस्त्यावरील चऱ्होली खुर्द येथील ज्ञानसागर वेअर हाऊसजवळ
ग्रामपंचायतीसाठी आणलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या लोखंडी पाइपांना आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या पाइप भस्मसात झाले. ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी तीनच्या दरम्यान घडली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दोन चाकण नगरपरिषदेचे एक अग्निशमन वाहन आणि काही पाण्याचे टँकर आणून आग दोन ते अडीच तासांत आटोक्यात आणण्यात आली. यासाठी स्थानिकांनीही पुढाकार घेतला.
प्राथमिक दृष्ट्या वीज मंडळाची तार शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे तर वीज मंडळाकडून सांगण्यात आले की, वाऱ्यामुळे पत्रा उडाला आणि वीज प्रवाह करणारी तार तुटल्यामुळे शॉर्टसर्किट झाले. मात्र अद्याप पंचनामा न झाल्याने आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
दरम्यान, आगीची तीव्रता पाहता सौरभ थोरवे यांनी अग्निशमन दलास पाचारण केले. चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन अंतर्गत कामासाठी लोखंडी पाइप गोडाऊन वजा जागेमध्ये उघड्यावर ठेवले होते. त्याच्या आजूबाजूला वाळलेले गवत होते. शॉर्टसर्किटमुळे दुपारी तीनच्या दरम्यान आग लागली आणि हवेमध्ये आगीचे लोळ पसरू लागले.
याबाबत चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बिंदले यांनी सांगितले की, जलवाहिनीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत असलेल्या ठेकेदाराने ठेवले होते. पाइपांची संख्या मोठी होती आणि आजूबाजूला गवत वाढले होते. यामुळे आगीमध्ये पाईपांचे मोठे नुकसान झाले.
वाऱ्यामुळे पत्रा उडाला आणि वीजपुरवठा करणारी तार तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. तेथील मीटर व्यवस्थित आहे. आमचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा करणार आहेत. दरम्यान, आगीच्या वेळेस काही काळ वीजपुरवठा खंडित केला होता.
- संदीप पाटील, कनिष्ठ अभियंता, आळंदी शहर वीज मंडळ
आळंदी नगरपरिषदेने दहा वर्षांपासून अग्निशमन वाहन दुरुस्त केले नव्हते. परिणामी इंजिनचे काम निघाले. दुरुस्तीसाठी शोरूममध्ये पाठवले आहे. याचबरोबर नव्याने आठ दिवसांत छोटी अग्निशमन वाहन नगरपरिषद विकत घेत आहे.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
07697
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.