पुणे

शालेय जीवनातील मंतरलेल्या दिवसांची अनुभूती

CD

आळेफाटा, ता. ९ ः सुमारे पन्नास वर्षांपूर्वी अकरावीत असणारे विद्यार्थी आज पुन्हा शाळेतील आठवणी जागवत एकत्र आले. जुने किस्से, शाळेत शिक्षकांनी केलेली शिक्षा, छोट्याशा गोष्टींवरून एकमेकांशी झालेले वाद आणि पुन्हा ‌झालेली गट्टी या साऱ्या गोष्टींना‌ उजाळा देताना कधी हास्याच्या लकेरी, तर कधी ओलावलेल्या डोळ्याच्या कडा जमलेल्या सर्वांनाच शालेय जीवनातील मंतरलेल्या दिवसांची पुन्हा एकदा अनुभूती देवून गेली, निमित्त होते राजुरी (ता. जुन्नर) येथील जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन १९७२-७३ च्या अकरावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. ५० वर्षांनंतर मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्नेहमेळाव्यास सुमारे ५० माजी विद्यार्थी उपस्थित होते.

श्री गणेशाच्या पूजनाने या स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली. शालेय शिक्षक व शालेय जीवनातील सहकारी मित्रांपैकी दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनतर पी. डी. संभूस, बाबासाहेब
नायकवडी, नामदेव रोहकरे, बाजीराव मंडलिक, प्रकाश संभूस, आबा मोरे, गो. रा. कांबळे, भाऊसाहेब पाटील, विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य जी. के. औटी, विजय औटी या शिक्षकांचा, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शाल-श्रीफळ, संत गाडगेबाबा यांची ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. उपस्थितांपैकी प्रत्येकाने आपल्या मनोगत मांडताना स्वपरिचय करून देत सुखदुःखाचे प्रसंग व आजवरची वाटचाल तसेच शाळेतले जुने किस्से अनुभव कथन करीत मेळाव्याची रंगत वाढवली. काही जणांनी शाळेमध्ये शिक्षकांनी मारलेल्या छडीमुळेच आज आम्ही यशस्वी होऊन घडू शकलो, अशा भावना व्यक्त केल्या.

या मेळाव्याचे आयोजन किसन हाडवळे, बबन गंधट, मोहना हांडे, सुनंदा कणसे, कस्तुरी गोसावी, सदाशिव औटी, शिवाजी हाडवळे, धोंडिभाऊ औटी, देवराम हाडवळे, राजाभाऊ शहा, अनंता डौले, काशिनाथ हाडवळे यांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. वाय. हाडवळे यांनी केले. सूत्रसंचालन सदाशिव डुंबरे यांनी, तर आभार बाळाजी औटी यांनी मानले.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT