पुणे

जैविक खताच्या जोरावर बहरली ''बबली''

CD

आळेफाटा, ता. २९ : भोरवाडी (ता.जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी अशोक काळे यांनी बबली वाणाच्या चवळीचे वीस गुंठ्यात भरघोस उत्पादन घेतले आहे. बारभावाचा वेध, पाणी तसेच जैविक खतांचे योग्य व्यवस्थापन यांचा समतोल साधल्याने केवळ ७५ दिवसांत पीक बहरले. यामुळे त्यांना एक टनापेक्षाही अधिक उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. सध्या दिवसाआड ४०० किलो चवळीचा तोडा मिळत असून, १० किलोस ३५० रुपये बाजारभाव मिळत आहे.

साधारणपणे ३ फेब्रुवारीत लागवड केल्यानंतर ७५ दिवसांमध्ये चवळीचे पीक तोडणीला आले. यासाठी काळे यांना ५० हजार रुपये खर्च आला. सुरवातीला जमीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरल्यानंतर रोटरून केली. त्यानंतर दोन ट्रॉली कोंबड खत पांगवले व साडेपाच फुटांच्या अंतरावर बेड पध्दतीने मंल्चिंग पेपर टाकून सरी काढली व यामध्ये दोन फुटांच्या अंतरावर बबली या जातीचे बियाणे लावले. तसेच संपूर्ण पिकाला टोमॅटोच्या पिकाला ज्या पद्धतीने मांडव केला जातो. त्याच पद्धतीने लाकडाचा मांडव उभा करून, झाडाच्या फांद्या सुतळीने बांधून आधार दिला.

दरम्यान, चवळी पिकातून झालेला खर्च देखील फिटला आहे व जवळपास ८ महिने हे पीक चालणार आहे. त्यातून चांगला नफा मिळेल. असा विश्‍वास काळे यांनी ''सकाळ''शी बोलताना व्यक्त केला, पीक घेण्यासाठी शेती मित्र किरण पकाळे, कृषी मित्र बाबाजी बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.

.....
चवळी पीक लागवड केल्यापासून आठ ते बारा महिने चालते. सध्या त्या बाजारात चांगली चांगली मागणी आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून, दहा किलोस ३५ ते ५० रुपये बाजारभाव मिळत आहे. तसेच या पिकासाठी कुठल्याही प्रकारे रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केला आहे. यामुळे पीक चांगले बहरले व उत्पादनात वाढ झाली.
- अशोक काळे, प्रगतशील शेतकरी

02784

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT