पुणे

बोरी बुद्रुक येथे रंगला माजी विद्यार्थी मेळावा

CD

आळेफाटा, ता. २९ ः बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील श्री संभाजी विद्यालयातील सन १९८७-८८च्या बॅचचे इयत्ता दहावीतील विद्यार्थी व शिक्षकवृंदांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा साजरा करण्यात आला. तब्बल ३५ वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेले होते. तत्कालीन दहावीच्या वर्ग मित्र व मैत्रिणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
मेळाव्याच्या सुरुवातीला सरस्वतीचे प्रतिमा पूजन केल्यानंतर शांताराम ब्रम्हे, कोंडाजी ढोले, शहाजी देशमुख, अंबादास डुंबरे, बबन शिंगोटे, शकुंतला पानसरे, कमल गुंजाळ, सीताराम रोकडे, शिवराम गुंजाळ, किसन घोलप या गुरुजनांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या स्नेहमेळाव्यानिमित्त ओळख परेड, स्नेहभोजन तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. हा मेळावा यशस्वीपणे पार पडण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले सुनील टेंबे, विलास जाधव, संजय डेरे, शरद शिंदे, रंजन जाधव, मीना पानमंद, संगीता डावखर यांनी प्रयत्न केले. या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी ५० फायबरच्या खुर्च्या भेट दिल्या. तर शाळेचे माजी विद्यार्थी असलेले‌ पाटीलबुवा जाधव यांनी शाळेतील ग्रंथालयासाठी १०० पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश उनवणे यांनी केले. तर प्रास्ताविक रंजन जाधव यांनी केले. आभार शरद शिंदे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT