पुणे

श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिरात कीर्तन सोहळा

CD

आळेफाटा, ता. १२ ः अध्यात्माचा प्रसार करत असताना जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या देहू गावात जुन्नर तालुक्यातील सुपुत्राने गाथा मंदिर बांधले आहे, याचा आम्हा जुन्नरकरांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्‍गार आमदार अतुल बेनके यांनी काढले.
जुन्नर, आंबेगाव, खेड व पुणे जिल्ह्यातील सर्व साधक मंडळी यांच्या वतीने प. पु. गुरूवर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आळे (ता. जुन्नर) येथील श्री. संत रेडेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी कीर्तन सोहळ्यास भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी बंडातात्या कराडकर, किरणताई वळसे पाटील, विष्णू हिंगे, पांडुरंग पवार, शरद लेंडे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, प्रीतम काळे, नेताजी डोके, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे, एकनाथ कुऱ्हाडे, संजय शिंदे, अविनाश कुऱ्हाडे, व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे, म्हतुजी सहाणे, चारूदत्त साबळे, विलास शिरतर, संतोष पाडेकर, संजय कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी घुले यांची ग्रंथ तुला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात सुदाम महाराज बनकर, नामदेव महाराज वाळके, राजाराम महाराज जाधव यांची प्रवचन सेवा तर वैभव महाराज राक्षे, ज्ञानेश्वर महाराज कदम, चैतन्य महाराज देगुलकर, चंद्रशेखर महाराज देगुलकर, उमेश महाराज दशरथे यांची कीर्तन सेवा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

SCROLL FOR NEXT