पुणे

राजुरी येथे ८१२ शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी

CD

आळेफाटा, ता. १३ : राजुरी (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाच्यावतीने पिकांची मोबाईल द्वारे ई-पीक पाहणी करण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, ग्रामपंचायत सदस्य शाकिर चौगुले, सखाराम गाडेकर,रंगनाथ पाटील औटी, संदीप औटी, अर्जुन हाडवळे, तलाठी धनाजीराव भोसले, ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ, नामदेव घंगाळे, आसिफ पटेल उपस्थित होते.
शासन निर्देशानुसार प्रत्येक शेतकऱ्याने ई-पीक नोंदणी करणे बंधनकारक असून या पुढील सर्व अनुदान किंवा योजनांचा लाभ पीक पाहणी नोंदवली असेल तरच मिळणार आहे. तसेच सदर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने राजुरी गावातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, नुकसान भरपाई, शासन अनुदान, सोसायटी कर्ज, बॅंक कर्ज, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे उपसरपंच माऊली शेळके यांनी सांगितले.
गावातील‌ प्रत्येक मळा, शिवार, वाड्या-वस्त्या या ठिकाणी ८१२ शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी व नोंदणी करण्यात आली. यासाठी नितीन औटी, सचिन औटी, अनिल औटी, गणेश हाडवळे, मच्छिंद्र हाडवळे, नीलेश हाडवळे, राजेश कणसे, पांडुरंग औटी, स्वप्नील हाडवळे, राहुल हाडवळे, भाऊसाहेब औटी, पंकज गवळी, सुदाम औटी, सचिन गटकळ, शिवराज औटी यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT