पुणे

उसाचे पाचट म्हणजे सोनं : चव्हाण

CD

आळेफाटा, ता.३ : सध्या जुन्नर तालुक्यात ऊस तोडणी सुरू असताना ऊस तुटल्यानंतर बहुतेक शेतकरी राहिलेले पाचट पेटवून देत आहेत.पण असे न करता त्यावर प्रक्रिया करून खत तयार करावे. उसाचे पाचट म्हणजे सोनं आहे, असे मत वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते, छत्रपती शिवाजी महाराज यशप्राप्ती पुरस्कार प्राप्त ऊस भूषण विकास चव्हाण यांनी केले आहे.
राजुरी (ता. जुन्नर) येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पाचट न जाळण्याचे आवाहन केले व पाचटाबाबत जनजागृती केली. पाचट ठेवल्यामुळे सतत वाफसा स्थिती जमिनी कायम राहते. यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ होते, पाण्याची बचत होऊन बाष्पीभवन कमी होते. दहा ते वीस दिवस ओलावा टिकून राहतो. जमिनीचे तापमान योग्य राखले जाते त्यामुळे उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होऊन जमिनीतील नत्र स्थिरीकरण स्फुरद पालाश उपलब्धतेचे प्रमाण वाढते तसेच ऊस उत्पादनात पाच ते सहा टनांनी वाढ होते
यावेळी ते पुढे म्हणाले, की बुडख्यावरचे पाचट सरीमध्ये ओढून बुडखा मोकळा करावा. ज्या ठिकाणी उसाचे बुडखे मोठे राहिले आहेत तो भाग कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावा. त्यामुळे जमिनी खालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची संख्या चांगली मिळण्यास मदत होते.

04259

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: अभिषेक शर्मा OUT, ४ खेळाडू IN? तिसऱ्या ट्वेंटी-२० साठी कशी असेल भारताची Playing XI? प्रिन्स यादव जखमी...

'सनई चौघडे' आणि 'हास्यजत्रा'नंतर निमिष कुलकर्णीची मोठी झेप; 'द्विधा'तून मोठ्या पडद्यावर एन्ट्री

मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज, नेमकं काय घडलं?

टीम इंडिया नंबर १ ! झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील विजयानंतर इंग्लंडला मागे फेकले

अभिजीतच्या घरी गेले शिंदेंचे मंत्री, आई-वडिलांची घेतली भेट; काय घडलं? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT