पुणे

पारंपरिकता जपत जीवनशैलीचा संदेश देणारा वासुदेव

CD

आळेफाटा, ता. २९ : वासुदेव म्हटलं की आपल्याला डोक्यावर मोरपीसाची टोपी घालून सकाळी दारोदारी अभंग, गवळण, भक्तिगीत गाणारे व्यक्तिमत्त्व समोर येते. हीच पारंपरिकता जपत त्यामध्ये काळानुसार बदल करण्याचा प्रयत्न मुळचे पंढरपूरचे असलेले आणि सध्या राजुरी येथे आलेल्या चंद्रकांत वासुदेव यांनी केला आहे.
वासुदेव हा प्रत्येक गावांमध्ये जाऊन सकाळच्या वेळी घरोघर हिंडून देवाची (पांडुरंगाची) गाणी, अभंग गवळणी म्हणतात. दान मागणारा लोककलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वासुदेवाचा वेश लहानग्यांसमवेत मोठ्यांनाही आकर्षित करणारा आहे.
या वासुदेवांनी आता पारंपरिकता जपत बदलत्या काळानुसार आपल्यामध्येही बदल केले आहेत. सध्या या वासुदेवाच्या मुखामध्ये हरिभजनाबरोबरच आत्ता समाजात असलेला तणाव दूर करण्यासाठी आणि आदर्श जीवन कसे जगावे याचा संदेश दिला जात आहे. ते गावातून फिरताना मोबाईलमुळे घरातील पूर्वीप्रमाणे होणारे संवाद तुटत चालले असल्याने मोबाईलचा वापर कमी करावा, वाचन करावे, महिलांचा आदर करावा, व्यसनांपासून दूर राहावे, मांसाहार करू नये, मुलांना चांगले शिक्षण द्यावे आदी आदर्शवत जीवनशैलीचे संदेश देण्याचे काम करत आहेत. त्यासाठी ते गाण्यांचा आधार घेत घराघरात हे विचार रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अनेक वर्षांपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावात जाऊन चांगला संदेश देण्याचे काम करत असतो. वासुदेव हा समाज प्रबोधनाचे काम करत असतो. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज वासुदेवांच्या सहाय्याने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवण्याचे काम करायचे. त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्वाचे काम पार पाडण्याची आमची अनेक वर्षांची परंपरा आहे.
चंद्रकांत वासुदेव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT