पुणे

आळे येथील रेडा समाधीची यात्रा शुक्रवारपासून

CD

आळेफाटा, ता. २९ : आळे येथील रेडा समाधीचा यात्रा महोत्सवास शुक्रवार (ता. ३) पासून सुरूवात होत असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष संदीप निमसे, यात्रा कमिटी अध्यक्ष गणेश शेळके, कार्याध्यक्ष एकनाथ कुऱ्हाडे, व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे यांनी दिली.
श्री क्षेत्र आळे (ता. जुन्नर) येथील रेडा समाधी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात्रा महोत्सवाची सुरूवात शुक्रवारी (ता. ३) भजन महोत्सवाने होणार आहे. शनिवारी (ता. ४) चैत्र एकादशीच्या दिवशी पहाटे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते मंदिरात शासकीय महापूजा होईल. दुपारी आळे गावापासून मंदिरापर्यंत पालखी सोहळा होणार आहे. रात्री हभप पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन आणि त्यानंतर तुकाईमाता विठ्ठलभक्त प्रासादिक भजन, भारूड मंडळ, राजुरी यांचा भारुडाचा कार्यक्रम रंगणार आहे.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. ५) सकाळी भाविकांसाठी संतवाडी, कोळवाडी, डावखरवाडी भंडारा विभाग ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे. दुपारी कुस्त्यांच्या आखाडा, तर रात्री विशाल महाराज हाडवळे यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी (ता. ६) हभप सुदाम महाराज बनकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. तसेच कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी शंभर रुपयांपासून ३० हजार रुपयांपर्यंतच्या रोख इनामी बक्षिसांच्या कुस्त्या होणार आहेत. अंतिम कुस्ती विजेत्या पहिलवानास मानाची चांदीची आळे केसरी गदा देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

HSC Exam Result : अंध मुलींचे बारावी परीक्षेत यश; जागृती स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा फॉर ब्लाइंड गर्ल्सचा १००% निकाल कायम

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

HSC Exam Result : बारावी निकालात सलग दुसऱ्या वर्षी घट; मंगळवेढ्याचा निकाल 80 टक्के

SCROLL FOR NEXT