पुणे

आळे येथे बालसंस्कार शिबिरास प्रतिसाद

CD

आळेफाटा, ता. १२ : आजच्या स्पर्धेच्या युगात बालकांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी भौतिक ज्ञानाबरोबर आध्यात्मिक संस्कारांची ही गरज असल्याचा हा उद्देश समोर ठेवून आळे (ता. जुन्नर) येथे (ता. ७) पासून भव्य मोफत निवासी बालसंस्कार शिबिर महोत्सव राबविण्यात येणार असून हे शिबिर (ता. २२) पर्यंत चालणार आहे.

श्री संत सावता महाराज धार्मिक व धर्मदाय देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, माऊली बाल वारकरी शिक्षण संस्था, श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळ यांच्यावतीने या शिबीराचे आयोजन केले आहे.

या शिबीरात विद्यार्थ्यांना योगासन, व्यायाम, विष्णू सहस्रनाम, श्रीमद्भगवतगिता पाठ, टाळ, पखवाज वादन प्रशिक्षण, गायन, क्लास, वारकरी चाली प्रशिक्षण, तसेच गीत संहिता, व्याख्यान, वारकरी भजनाच्या चाली, हरिपाठ व पाठांतर, कीर्तन प्रवचन, गायन शिकवले जात आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सर्वश्री बाळकृष्ण महाराज कुऱ्हाडे, विशाल महाराज हाडवळे, बाळशिराम महाराज डावखर, अरुण महाराज गुंजाळ, तुकाराम महाराज कुरकूटे, संतोष महाराज साळुंखे, डॉ‌. सचिन शिंदे, वैभव महाराज मेंगडे, अनिल महाराज रूपवते, गजानन महाराज शेजूळ, मच्छिंद्र महाराज गरुड, साईनाथ महाराज काळे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अनिल महाराज काकडे, माऊली महाराज गायकवाड, कार्तिक महाराज काकडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT