पुणे

निधी खर्चण्यासाठी वेळ वाढवून मिळावा

CD

आळेफाटा, ता. १६ : विविध वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायत खात्यावर प्रत्येक गावाला लोकसंख्या आणि ग्रामपंचायतीच्या महसूली क्षेत्रफळाचा अभ्यास करून निधी दिला जातो. मात्र चौदाव्या वित्त आयोगाचा जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निधी खात्यांवर अद्याप अखर्चिक स्वरूपात आहे. निधी खर्च करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली होती. परंतु तो आहे तसा शिल्लक आहे. निधी खर्चण्यासाठी दोन महिने अधिकचा कालावधी मिळावा अशी मागणी तालुक्यातील सरपंच आणि अधिकाऱ्यांची आहे.
जुन्नरमध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीला मुदतवाढ देऊन देखील तालुक्यातील ग्रामपंचायत खात्यांवर एक कोटी बारा लाखांहून अधिक रक्कमेचा निधी अद्याप अखर्चिक स्वरूपात आहे. सदर निधीला खर्च करण्यासाठी याआधीही मुदत वाढीची मंजुरी मिळाली होती. ती मंजुरी ती तालुका कमिटीच्या अखत्यारीत होती. या आयोगाच्या मंजूर आराखड्यांची दुरुस्तीची मंजुरी जिल्हा परिषद पुणे या कार्यालयाकडे होती. या काळात हस्तलिखित आराखडा आणि संगणकीय मंजुरीमध्ये अडचणी येत होत्या.
दरम्यानच्या काळात सरपंचपदाचा कालावधी संपल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचे काम प्रशासकाकडे गेले. प्रशासक अधिकाऱ्यांना स्वत:चा पदभार सांभाळून एका-एका अधिकाऱ्यास सुमारे १५ हून अधिकची गावे पहावी लागत होती. या सर्वच कारणांमुळे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केली जाणारी विकासकामे पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. त्यामुळे राहिलेला निधी खर्च करण्यासाठी मुदत वाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निधीची रक्कम खर्च करण्यासाठी विविध विकासकामांच्या कार्यारंभाचे आदेश दिले आहेत. जवळपास सर्वच कामे पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. आता मात्र शासनस्तरावर या निधीच्या खर्चाला दोन महिन्यांचा अधिकचा कालावधी मिळावा अशी मागणी जुन्नर तालुक्यातील अखर्चिक ग्रामपंचायत सरपंच आणि अधिकाऱ्यांची आहे. अखर्चिक आकड्यांबाबतची संपूर्ण तालुक्याची माहिती घेतली असून जिल्हा परिषद पुणे या कार्यालयाला कळविली आहे.
सचिन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी जुन्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT