पुणे

आळेफाटा बाजार समितीत हजारो कांदा पिशवीची आवक

CD

आळेफाटा, ता. ३ : आळेफाटा येथील उपबाजारात रविवारी (ता. २) कांद्याच्या १३ हजार २८ पिशवीची आवक झाली असून चांगल्या प्रतीच्या गोळा कांद्यास दहा किलोला २७१ रुपये बाजारभाव मिळाला आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, नबाजी गाडगे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयांत एक नंबर कांद्यास दहा किलोस २३० ते २५० रुपये बाजारभाव मिळाला तर दोन नंबर कांद्यास २०० ते २३० बाजारभाव मिळाला‌‌. तीन नंबर गोल्टी कांद्यास १५० ते २०० रुपये बाजारभाव मिळाला तर चार नंबर बदला गोल्टी कांद्यास दहा किलोस ८० ते १४० बाजारभाव मिळाला.
दरम्यान, येथील बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या मोंढयात कांद्याचा बाजारभावात किलो मागे ५ ते ६ रुपयांनी भाव वाढ झाली होती परंतु रविवारी पुन्हा बाजारभावात घसरण झाली असल्याची माहिती संतोष कुऱ्हाडे, विजय कुऱ्हाडे, अनिल गडगे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे, संदीप कोरडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: ना CSK, ना KKR... आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचणार? ऑरेंज कॅप, पर्पल कॅप कोणाला?

धक्कादायक ! ICU मधील वृद्ध महिला रुग्णाला उंदरांनी कुरतडले; रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड

Mumbai: चाळीतली खोली ते 2BHK फ्लॅट! BDDवासियांना मिळाल्या नव्या घरांच्या चाव्या, ८६४ रहिवाशांची स्वप्नपूर्ती

चाबहार पोर्टजवळ अमेरिकेचे हल्ले, लढाऊ विमानातून बॉम्ब फेकल्यानं विध्वंस; भारतासाठी हे महत्त्वाचं बंदर

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

SCROLL FOR NEXT