पुणे

आळेफाटा, ओतूर, नारायणगाव येथे सन्मान

CD

आळेफाटा, ता. ४ : एक जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स ‘डे’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांच्यावतीने आळेफाटा, ओतूर, नारायणगाव या परिसरातील सर्व डॉक्टरांचा सन्मान आयोजित केला होता.


एक जुलै डॉक्टर्स डे आणि महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल ने सर्व डॉक्टरांचा सन्मानपत्र आणि शाल देऊन सन्मान केला यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नाईकवाडी तसेच त्यांच्या समवेत आलेल्या १०० डॉक्टरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलच्या नवनिर्वाचित अध्यक्षा विद्या जाधव, उपाध्यक्ष सरिता पोखरणा, सचिव सोनाली गांधी तसेच रोटरी क्लब ऑफ
चाकणचे अध्यक्ष डॉ .अमोल बेनके, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहणे म्हणून डॉक्टर बेनके यांनी समाजाप्रती डॉक्टरांचे असलेले कर्तव्य व सेवाभाव याविषयी आपले मत मांडले. व डॉक्टरांना रोटरी क्लब कडून मिळत असलेल्या सहकार्याब‌द्दल त्यांनी आभार व्यक्त केले त्याचप्रमाणे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नाईकवाडे यांनी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल ला व त्यांनी करत असलेल्या कामाब‌द्दल गौरवोद्‌गार काढले व समाजातील सर्व घटकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत असे सांगितले.

यावेळी उपस्थित त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचे अध्यक्ष महावीर पोखरणा, असिस्टंट गव्हर्नर ज्ञानेश जाधव, माजी उपाध्यक्ष संभाजी हाडवळे, सचिव पराग गांधी, विमलेश गांधी, रो विशाल पा भुजबळ, नीलेश भंडारी, सागर लामखडे, पंकज चंगेडिया, संदीप लोढा, गणेश गडगे, विजय कणसे, सुजाता कणसे, पुनम गुगळे, आणि इतर सर्व रोटरीयंस व डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार सोनाली गांधी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT