पुणे

राजुरीत आढळला मृत बिबट्या

CD

आळेफाटा, ता. ११ : राजुरी (ता. जुन्नर) या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतात बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी येथील हातवळण मळ्यात राहात असलेले मोहन भीमाजी हाडवळे हे आज सकाळी ११च्या सुमारास जनावरांसाठी हत्तीगवत तोडण्यासाठी घराजवळच असलेल्या शेतावर गेले होते. गवतातून उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता, त्या ठिकाणी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. हाडवळे यांनी लगेचच याबाबतची माहिती वन अधिकाऱ्यांना कळवली. त्यानंतर वनअधिकारी लहू ढोकळा, त्रिंबक जगताप, स्वप्नील हाडवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केली. मृत बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी कोळवाडी या गावात शिवाजी बजाबा गाढवे यांच्या शेतात मृत बिबट्या आढळून ला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी राजुरी येथे दुसरा मृत बिबट्या आढळून आला असल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी सभापती दीपक‌ औटी, उपसरपंच माऊली शेळके यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT