आळेफाटा, ता. ७ : ‘‘आजच्या युवा पिढीने नोकरीकडे न वळता लघुउद्योगांकडे वाटचाल करावी,’’ असे आवाहन युवा उद्योजक व सात्त्विक डी फुड्सचे संतोष डौले यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समर्थ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कौशल विकास ‘स्किलेज’ या कार्यशाळेसाठी तिसऱ्या दिवशी राजुरी (ता. जुन्नर) येथील सात्त्विक-डी फूड्सला भेट देण्यात आली होती. तेव्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डौले बोलत होते.
याप्रसंगी गावचे उपसरपंच व समर्थ शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्रा. डॉ. उत्तम शेलार, गंगाराम औटी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान डौले यांनी शेती करत असताना घरातील व्यक्तींना घेऊन एक छोटासा लघुउद्योग चालू केला. या लघु उद्योगांमध्ये ते आज चकली, शंकरपाळी, लाडू यांसारखे खाद्यपदार्थ बनवत आहेत. अतिशय मॉर्डन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. तसेच या खाद्यपदार्थांना मुंबई पुणे सह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे त्यांनी बनविलेल्या पदार्थांचा दर्जा व गुणवत्ता यामुळे त्यांना आज परदेशातून विशेष करून अमेरिका या देशातून, तसेच स्थानिक बाजारपेठेत सुद्धा या पदार्थांना खूप मागणी आहे. आज कुटुंबातील पाच सदस्यांबरोबर दोन कामगारांना रोजगार पुरवत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश जाधव, प्रा.कल्याणी शेलार, प्रा. सद्दाम मणियार, प्रा. गणेश बोरचटे, प्रा. सतीश भवाळ यांनी केले होते. प्रा. दीपक साबळे यांनी सूत्रसंचालन व प्रा. गणेश बोरचटे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.