पुणे

जुन्नरच्या पूर्व भागास थ्रीफेज वीज द्या

CD

आळेफाटा, ता.१८ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना दिवसभर थ्री फेज वीज द्यावी, अशी मागणी महावितरणकडे शेतकऱ्यांच्या वतीने वल्लभ शेळके यांनी केली आहे.
राजुरी, बेल्हा, जाधववाडी, बोरी बुद्रुक, साळवाडी, गुंजाळवाडी, आळे, वडगाव आनंद, वडगाव कांदळी, या गावामध्ये सध्या महावितरण कंपनी दिवसा फक्त चारच तासच वीज देत आहे. यामुळे पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच परिसर बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडत आहे. येथे केव्हाही बिबट्या हल्ला करू शकतो, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे महावितरण कंपनीने दररोज दिवसा आठ तास कृषिपंपांना वीज द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान राजुरी फिडर ओव्हरलोड असल्यामुळे पूर्ण फिडर चालू केल्यास थ्री फेज लाईन पाच ते दहा मिनिटात बंद होते त्याच्यामुळे आम्ही उंच खडक व पानसरे मळा साइड असे दोन साईडला चार चार तास सप्लाय सोडत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT