पुणे

डोंगराला लागलेल्या आगीमुळे आळे परिसरात वन्यप्राण्यांचे हाल

CD

आळेफाटा, ता.१५ : आळेफाटा परिसरातील आळे, राजुरी, उंचखडक (ता.जुन्नर) या गावांच्या एका बाजूला डोंगर आहे. डोंगरावर अज्ञाताने पेटवलेल्या वणव्यामुळे वन्यप्राण्यांचे हाल होत आहेत. वणवा पेटवण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. पक्ष्यांचाही आगीत होरपळून मृत्यू होत आहे. याकडे वनविभागाने गार्भियाने लक्ष देण्याची मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.

आगीमुळे संपूर्ण डोंगरावर असलेले झाडी झुडपे जळून खाक झाली आहेत. तर याचा मोठा फटका या ठिकाणी असलेले मोर, ससा, हरिण, कोल्हा या प्राण्यांना तसेच कावळा चिमणी, पोपट या पक्ष्यांना आगीचा दाह सोसावा लागत आहे. तसेच राजुरी, उंचखडक तसेच आळे गावच्या हद्दीत असलेल्या डोंगरावर गेल्या पंधरा दिवसांपासून दोन ते तीन वेळा अज्ञात व्यक्तीने डोंगरावर जाऊन आग लावली आहे.
दरम्यान, आळेफाटा परिसरातील उंचखडक व आळे या दोन गावांमध्ये जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्र हे जंगलांनी व्यापलेले आहे. यामध्ये आळे गावातील कोळवाडी व संतवाडी ही दोन गावे जोडलेली आहेत तर उंचखडक या गावाला आबाटेक ही जोडलेली आहेत विशेष म्हणजे या सर्व गावातील जंगलांच्या एका बाजू संपूर्ण डोंगरांनी व्यापलेला आहे. या जंगलात हरिण, मोर, वाघ, हे मोठ्या प्रमाणावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT