आळेफाटा : शिरोलीतर्फे आळेच्या (ता.जुन्नर) उपसरपंचपदी सुरेश सातपुते यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच दत्तात्रेय डावखर यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच प्रिया खिल्लारी व ग्रामसेवक राजश्री शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली. यामध्ये उपसरपंच पदासाठी सुरेश सातपुते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मालन सोनवणे, मीना आखडकर, सखुबाई काळे, मिनाक्षी खिल्लारी, बाजीराव मुळे, दत्तात्रेय डावखर हे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच सातपुते यांचा मुलानी गुरुजी, अजित खिलारी, रोहित खिलारी, चेतन सोनवणे, अविनाश खिलारी, बाळासाहेब खिलारी, दत्तात्रेय सातपुते, सुरेश खिलारी, रमेश सोनवणे तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
06253
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.