आळेफाटा, ता.१५ : टोमॅटोसह इतर पालेभाज्यांना बाजारभाव घसरले आहेत. यामुळे आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो, फ्लॉवरच्या पिकात मेंढ्यांना सोडल्या आहेत. बाजारभावाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे.
जुन्नर तालुक्यात सध्या ढगाळ वातावरणासह पाऊसही पडत आहे. तसेच बाजारात शेतकऱ्याच्या भाजीपाला पिकाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर फ्लॉवर उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी जेमतेम पाण्यावर घेतलेल्या फ्लॉवर, कोबी, मिरची यांसारख्या प्रमुख भाजीपाला शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळाला. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
साधारपणे तीन ते चार महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या एका क्रेटला ४०० ते ५०० रुपये बाजारभाव मिळत होता. आता तेवढ्याच क्रेटला शंभर रुपये देखील मिळत नाहीत. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे. अधिक अडचणीत असलेला शेतकरी कवडीमोल बाजारभावामुळे हवालदिल झाला आहे.
पावसामुळे हातात येणारे पीक वाया गेले आहे. शेतमाल चांगल्या प्रकारे पिकवितो आणि विकण्याची वेळ येते तेव्हा कवडीमोल बाजारभाव मिळतो. सध्या महागडे बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजुरीचा खर्च सुटणे कठीण झाले आहे. सध्या शेतीत कमविले यापेक्षा किती गमविले याचे गणित जुळत नाही. गाडी भाडे, मजुरी खिशातून द्यावी लागत आहे, यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
06257
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.