आळेफाटा, ता. ५ : वाढत्या महागाईमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कुडाची पारंपरिक कांदा बराख करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. लोखंड व स्टील यांचे भाव वाढ आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने लोखंडी कांदा चाळ उभारू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून आळे, राजुरी, बेल्हे, आणे, नळवणे,पेमदरा,पारगाव,मंगरूळ, लवणवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवणुकीसाठी जुन्या पद्धतीच्या कुडाच्या आरणी तयार करून त्यात कांदा साठवणूक करीत आहेत.
बराख तयार करण्यासाठी बाजरीचे सरमाड, पाचट, बांबू, प्लॅस्टिक ताडपत्री यांचा वापर करण्यात आलेला आहे. साधारणपणे गरजेनुसार लांबी व चार फूट रुंद याप्रमाणे एका आरणीत साधारणपणे ५०० ते ६०० पिशवी कांदा बसू शकतो. या आरणीत कांदा साठण्याचे प्रमाण फार कमी असते. तसेच कांद्याचा कलर व पत्ती चांगली राहते. अलीकडे महाराष्ट्र शासन मार्फत राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाकडून सध्या कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के व कमाल ३,५०० रुपये प्रतिटन क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते. हे अनुदान अतिशय तुटपुंजे आहे. शासनाने ते वाढवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आळेफाटा (ता.जुन्नर) : शेतकऱ्यांनी बनवलेली कुडाची कांदा चाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.