पुणे

आळेफाटा परिसरात पिकांना अट

CD

आळेफाटा, ता.२६ : आळेफाटा परिसरातील नगदवाडी, वडगाव कांदळी, साळवाडी, संतवाडी, आळे, वडगाव आनंद, राजुरी, बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) या परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे वाया गेलेली आहेत.
गेल्या आठ दिवसापासून चालु असलेल्या शेतमालात पाणी साचलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उन्हाळी बाजरी, फ्लॉवर, कोबी, धना, मेथी, भेंडी, काकडी, मिरची, वांगी, टोमॅटो या भाजीपाला पिकांबरोबरच झेंडू, चारा पिके मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकांचे संगोपन केले आहे. परंतु सततच्या संततधार पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही वसूल होणार नाही. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी या परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकाबरोबरच चारा पिकांचे, कांदा पिक काढणी अभावी शेतातच सडून गेला आहे तर काही शेतकऱ्यांनी कांदा शेतात काढुन ठेवला आहे तो पूर्णपणे पावसाच्या पाण्याणे वाहून गेला आहे. उन्हाळी बाजरीचे पीक अंतीम टप्प्यात आलेले असताना बाजरी सपाट झाली आहे तरी कृषी विभाग, महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत.
- वल्लभ शेळके, शेतकरी

06439

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : माझ्याकडे पैसे नाहीत, वेतन रोखल्यानं TCSच्या ऑफिसबाहेर फूटपाथवर झोपला तरुण; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

Team India's Next schedule: इंग्लंड दौरा संपला, पुढे काय? टीम इंडियाच्या पुढील सर्व स्पर्धा, मालिकांचे वेळापत्रक एका क्लिकवर

Kolhapur Village Gold Rain : पाऊस पडला की 'या' गावात शेतामध्ये सोनं सापडतेच, अनेक वर्षांपासून प्रत्यय

Daily Exercise Benefits: रोज फक्त 30 मिनिटं व्यायाम करा अन् कर्करोगाचा धोका 30% कमी; संशोधनातील मोठा खुलासा

'आज की रात...' हे गाणं एकल्याशिवाय मुलं जेवतच नाही' तमन्नाच्या वक्तव्यावर नेटकरी म्हणाले...'अशा प्रकारच्या पार्टी...'

SCROLL FOR NEXT