पुणे

‘स्वतः च्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा’

CD

आळेफाटा, ता. २६ ः आळेफाटा पोलिस ठाणे हद्दीच्या गावांमधील नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी केले आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी कॅमेरे बसवून घेण्यासाठी यामध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका ग्रामीण भागातील पतसंस्था, बँका व व्यावसायिकांची राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, पोलिसांच्या उपक्रमाला अनेकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कॅमेऱ्यांचा सर्वाधिक उपयोग होणार असल्याने जास्तीत जास्त कॅमेरे बसवावेत, असे आवाहन आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी केले आहे. कोणताही गुन्हा घडल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी व नंतर शिक्षा होण्यासाठी सीसीटीव्हीत झालेले चित्रण अनेकदा महत्त्वाचा पुरावा म्हणून उपयोगी ठरत असल्याचे अलीकडच्या काही वर्षांत वारंवार सिद्ध झाले आहे. आळेफाटा शहरासह ग्रामीण भागाचा विस्तार मोठा वाढत आहे. कॅमेरे बसविल्यामुळे गेल्या काही महिन्यात गुन्ह्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याचे जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: आव्हाडांच्या लेकीवरही खालच्या भाषेत टीका, नताशा म्हणाली, "फडणवीस तुम्ही फक्त मजा पाहा…" शेअर केला स्क्रीनशॉट!

अरणमध्ये साकारणार संतसृष्टी संग्रहालय! 'तीर्थक्षेत्राचा १५० कोटींचा आराखडा', संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी

Latest Marathi News Updates : पुण्यात कोयता गँगचा राडा, तोडफोडीनंतर गाड्या पेटवल्या

Vidhanbhavan Rada : विधिमंडळ हाणामारी प्रकरणातील सांगलीचा ऋषी टकले सराईत गुन्हेगार, विनयभंग, खुनी हल्ले, मारामारी; झोपडपट्टीदादा म्हणून ओळख

Solapur Crime: पोफळी (पांडवाची) येथील धर्मराज मंदिरात देवाच्या चांदीच्या साहित्याची चोरी, होळ पोलिसात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT