पुणे

आळे येथील महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत एसटी पास

CD

आळेफाटा, ता. ३ : ‘‘नारायणगाव एसटी प्रशासनातर्फे शासनाच्या अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या सर्व बारावीच्या विद्यार्थिनींसाठी पास विद्यालयातच येऊन देण्यात आले,’’ अशी माहिती नारायणगाव आगार व्यवस्थापक तुकाराम पवळे व शिवाजी वायकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांचा वेळ एसटी पाससाठी बसस्थानकात वाया जाऊ नये, याकरिता वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालयात जाऊन पास व ओळखपत्र देण्याची सुविधा महामंडळाकडून दिल्याचे आळेफाटा वाहतूक निरीक्षक मणियार यांनी सांगितले. तसेच ओतूर-आळेफाटा, म्हस्केवाडी- अळकुटी- बेल्हा- आळेफाटा, पोखरी- पळसपूर- नळवणे फाटा- आणे- बेल्हा- आळेफाटा या तीन मार्गावर महाविद्यालयाच्या वेळेत बस सुरू करण्यात येतील, असे नारायणगाव आगर प्रमुखांनी सांगितले. त्या संदर्भात प्राचार्य व संस्थेने तातडीने पत्रव्यवहार करावा, अशी सूचना करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अर्जुन पाडेकर, प्राचार्य संदीप भवारी, उपप्राचार्य सुरेश कुऱ्हाडे, पर्यवेक्षक जी. सूर्यवंशी, ग्रंथपाल एस. पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT