पुणे

घरफोडी करणाऱ्या टोळीच्या आवळ्या मुसक्या

CD

आळेफाटा, ता.१९ : वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथे दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीस आळेफाटा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी पाच दिवसांत मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांनी शनिवारी (ता.१९) माहिती दिली. पोलिसांनी पाच चोरट्यांकडून १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव आनंद (ता.जुन्नर) या ठिकाणी शनिवारी (ता. ५) मध्यरात्रीच्या सुमारास चेतन रमेश चौगुले यांच्या घराचा चोरट्यांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ५० हजारांची चोरी केली होती. त्यांच्या घराजवळ राहणारे प्रशांत अनंतराव चौगुले यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरातील चांदीचे भांडी व रोख रक्कम असा दोन लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता असा दोन्ही घराचा मिळून एकूण पाच लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेल्याची फिर्याद चेतन चौगुले व प्रशांत चौगुले यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात नोंदविली होती. या गुन्ह्याचा तपास आळेफाटा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या वतीने सुरू करण्यात आल्यानंतर एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने पोलिसांनी अतिशय चिकाटीने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहीतगार यांच्या साहाय्याने सदरचा गुन्हा हा करतेवेळी आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअपचा वापर केल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर यामधील शिरूर व नेवासा (अहिल्यानगर) येथून सोमनाथ भिमनाथ बामणे (वय ३७, रा. गुणवंतवाडी ता.गुनाट ता. शिरूर), संदीप कैलास भालेराव (वय २८, रा. सुरेगाव (गंगा) ता. नेवासा जि. अहिल्यानगर), संदीप बबन धोत्रे (वय ३७, रा. पोस्ट ऑफिस जवळ, न्हावरा ता. शिरूर, श्रीमंत जिवलाल चव्हाण (वय ५२, रा. देऊळगाव मोठ्या तलावाजवळ देऊळगाव सिद्धी ता. जि. अहिल्यानगर), आकाश लकड्या भोसले (वय १९, राहुकुम कॉलनी, पारधी वस्ती, पाण्याच्या टाकी जवळ शिरूर), या आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पीकअप (एम.एच.१२ डब्लू‌ एक्स ८२०८) व गुन्ह्यास चोरी केलेली १८०० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे

06717

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगडचा विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शिखर समितीकडे पाठवला जाणार

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT